मायलेकीच्या आशीर्वादाने सावंतवाडीतील जनता यंदा ३६ वर्षाच्या तरुणाला निवडून देतील…

विशाल परब यांचा विश्वास: विविध नेते मंडळी आपल्या उमेदवारांच्या प्रचाराला येत असले तरी माझे स्टार प्रचारक “शेतकरी बांधव”…

⚡सावंतवाडी ता.०५-: जनतेच्या आशीर्वादाने मी आज राज्यभर पोचलो असून, माझ्या मागे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील जनता उभी राहून परिवर्तन घडवेल असा विश्वास त्यांनी आज आयोजीत पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. यावेळी आपण कोणावरही टीका टिप्पणी करणार नसून, माझ्यासारखे हजारो विशाल परब तयार होण्यासाठी माझे प्रयत्न असणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या 23 तारखेला माझ्या विजयाचा गुलाल उधळला जाईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, पक्षाने नियमानुसार माझ्यावर कारवाई केली असली तरी मी कोणावरही नाराज नाही. पक्षाने त्यांचे काम केले असले तरी मी माझी निष्ठा बदलणार नाही. 23 नोव्हेंबरला गुलाल उधळून मी जनतेसमोर असणार आहे. यावेळी इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी विविध नेते जरी येत असले तरी, माझ्या प्रचाराला मात्र शेतकरी बांधव, माझी जनता हेच स्टार प्रचारक असणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

You cannot copy content of this page