*💫मालवण दि.१६-:* कुंभारमाठ ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार एक युवा नेतृत्व श्री मनोज वाटेगावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यावेळी अध्यासी अधिकारी म्हणून ग्रामसेवक श्री गणेश दत्ताराम नलावडे यांनी काम पाहिले. त्यावेळी ग्रामपंचायत सरपंच श्री.प्रमोद भोगावकर,मावळते उपसरपंच श्री बाळा माने, सदस्य श्री विनोद भोगावकर ,सौ.प्रणिता लंगोटे,सौ.प्रिया लंगोटे,श्री किशोर पवार,सौ.आचल गावठे,सौ.पुनम सावळे,जिल्ह्याचे भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस श्री बाबा परब,कुंभारसमाज तालुका अध्यक्ष दिलीप सांगवेकर,श्री.प्रसाद परुळेकर,मधुकर चव्हाण,श्री.राजू साळगावकर,श्री.आनंद सावळे आदि ग्रामस्थ उपस्थित होते …
कुंभारमाठ गावच्या उपसरपंच पदी मनोज वाटेगावकर यांची बिनविरोध निवड…
