श्री गणराज आदर्श सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ साटेली यांच्यावतीने दीपावली शो टाईम चे आयोजन…

⚡दोडामार्ग ता.०२-: श्री गणराज आदर्श सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ साटेली यांच्या वतीने दीपावली शो टाईम २०२४ (वर्ष – १९) या निमित्त विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचे श्री गणराज कलामंच साटेली येथे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमांची सुरुवात रविवार दिनांक ०३ नोव्हेंबर २०२४ रात्री ०९ :०० वाजता नितीन आसयेकर प्रस्तुत भूमिका दशावतार लोककला मंडळ यांचा महान पौराणिक ” संत बाळूमामा ” या नाट्य प्रयोगाने होणार आहे. त्या नंतर सोमवार दिनांक ०४ नोव्हेंबर २०२४ संध्याकाळी ०७:३० वाजता आमने – सामने २० × २० डबलबरीचा जंगी सामना श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ वर्दे कुडाळचे बुवा श्री . विजय उर्फ गुंडू सावंत गुरुवर्य – अशोक सावंत, पखवाज – विराज बांवकर,तबला – सागर कदम विरूद्ध श्री भूतेश्वर प्रासादिक भजन मंडळ खुडी( देवगड) बुवा श्री . संतोष दत्ताराम जोईल गुरुवर्य – श्री श्रीधर बुवा मुणगेकर , पखवाज – अक्षय मेस्त्री , तबला – मांगरीश घाडी यांचा डबलबारी भजनाचा सामना होणार आहे. त्यानंतर बुधवार दिनांक ०५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता सत्यनारायण महापुजा , दुपारी १ वाजता आरती व महाप्रसाद व रात्री सांस्कृतिक कार्यक्रम अशा प्रकारे आयोजन करण्यात आले आहे. तरी रसीक प्रेक्षकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री गणराज आदर्श सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ साटेली यांच्या वतीने करण्यात आले आहे .

You cannot copy content of this page