संजू परब: सावंतवाडीकरांनी ज्यांचे डिपॉझिट जप्त केले त्यांनी केसरकरांवर बोलू नये…
⚡सावंतवाडी ता.०१-: विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला करणारी संशयित व्यक्ती नक्की कणकवलीत काम करत होती की विशाल परब यांच्या बंगल्यावर कामाला होती. यांची पोलिसांनी तपासणी करावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केली आहे. गाडीवर हल्ला करून घेऊन सहानभुती मिळवून मत मिळविण्याचा हा प्रकार असू शकतो, असा आरोप देखील त्यांनी यावेळी विशाल परब यांच्यावर केला आहे.
असल्या कोणत्याही स्टंटबाजी ला इथली जनता बळी पडून मत घालणार नाहीत. तर त्यासाठी काम करावे लागते असे देखील स्पष्ट केले आहे.
यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, उपरकर आणि साळगावकर यांचे यापूर्वी सावंतवाडीकारानी डिपॉझिट जप्त केले आहे. त्यामुळे त्यांनी दीपक केसरकर यांच्यावर टीका करू नये, राजन तेली यांचा पराभव अटळ आहे. असे मत व्यक्त केले आहे.
