नितेश राणे यांचा विरोधकांना इशारा; दीपक केसरकर यांना विजयी करण्यासाठी केले आव्हान…
सावंतवाडी ता.२९-:
दीपक केसरकर हे अनुभवी नेते असून, त्यांनी शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे. त्यामुळे मतदान करतेवेळी विचारपूर्वक मतदान करा असे आवाहन नितेश राणे यांनी केले आहे. या मतदारसंघात रवींद्र चव्हाण यांचे नाव वापरून जर कोण मस्ती करत असेल तर त्याचे घर आम्हाला माहिती आहे. हे त्याने विसरू नये असा इशारा देखील यावेळी विरोधकांना दिला आहे.
यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, दीपक केसरकर हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यामुळे कोणी दिशाभूल करत असेल तर त्याला बळी पडू नका, धनुष्यबाण चिन्ह लक्षात ठेवा आणि धनुष्यबाण समोरील बटन दाबून भरघोस मतांनी दीपक केसरकर यांना निवडून आणा असे आवाहन केले आहे.
