दीपक केसरकर यांचे भावनिक आवाहन:सावंतवाडीकरांना कोणीही विकत घेवू शकत नाही..
⚡सावंतवाडी ता.२९-: मतदारसंघातील मी अनेक प्रश्न मार्गी लावले. त्यामुळे आज मला मनाचे समाधान वाटत आहे. परंतु हे सर्व श्रेय तुमचे आहे. मला पुन्हा एकदा तुमची सेवा करण्यासाठी साथ द्या, असे आवाहन मंत्री दिपक केसरकर यांनी आज येथे केले. दरम्यान कोणीही पैसे घेऊ नका. पैशाने सावंतवाडीकरांचा विकत घेता येत नाही. त्यांची जागा त्यांना दाखवून द्या, असाही केसरकर यांनी विरोधी उमेदवारांना टोला लगावला.
