राजन तेलींच सावंतवाडीत जोरदार शक्ती प्रदर्शन…

केसरकर यांच्या निवासस्थानासमोर जोरदार घोषणाबाजी: काही काळ वातावरण तंग

⚡सावंतवाडी ता.२९-: महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत शहरातून भव्य रॅली काढली आहे. यावेळी रॅली महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या घरासमोर आली असताना जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मात्र याठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त असल्याने कोणताच अनुचित प्रकार घडला नाही. मात्र याठिकाणी काही काळ वातावरण तंग होते. यावेळी महाविकास आघाडीचे सर्व वरिष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. काही वेळातच ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत

You cannot copy content of this page