पाटेकर चरणी संजू परब यांचे गाराणे
⚡सावंतवाडी ता.२९-: मंत्री दीपक केसरकर महायुतीचे उमेदवार म्हणून सावंतवाडी मतदार संघासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ते पुन्हा आमदार झाल्यास म्हणजेच विजयाचा चौकार मारल्यास आपण पाटेकर चरणी पाच हजार नारळाचं तोरण अर्पण करणार असं गाराने सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आज पाटेकर चरणी घातले.
