*💫बांदा दि.१५-:* दांडेलीतील अर्धवट राहिलेल्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन सरपंच कृष्णा उर्फ दादा पालयेकर यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोना काळातही गावाचा विकास होत असल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात आले. गुढीपाडव्यादिवशी करण्यात आलेल्या भूमिपूजनप्रसंगी उपसरपंच सत्यनारायण माणगावकर, ग्रा.पं.सदस्य रिचा शेटये, प्रफुल्लता मालवणकर, सामाजिक कार्यकर्ते दादा गावडे, माजी सरपंच बाळा मोरजकर, स्मिता मोरजकर, माजी उपसरपंच योगेश नाईक, माजी ग्रा.पं.सदस्य संजू पांगम तसेच ग्रामस्थ सुनिल मोरजकर, संदीप माणगावकर, दुर्गेश मोरजकर, विष्णू मोरजकर, सतीश बिरोडकर, रमेश गावडे, राजन मोरजकर, मेघशाम नाईक, सखाराम मोरजकर आदी उपस्थित होते. डोंगरी विकास नियोजन मधून तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून सदर काम होत असल्याचे संजू पांगम यांनी सांगितले.
दांडेलीतील रस्त्याचे भूमिपूजन…
