राजन तेली: आंबोलीत ठाकरे सेनेकडून राजन तेली यांचा सत्कार..
⚡आंबोली,ता. २४-: शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी माझी जिल्हाप्रमुख म्हणून नेमणूक केली होती. २00५ मध्ये नारायण राणे यांच्यासोबत गेलो ती एक चुक होती त्यामुळे अनेक चुका कराव्या लागल्या.मी माझ्या मूळ घरात आलोय.शिवसेना कार्यकर्त्यांनी मतदारांनी आता परिवर्तन करून पुन्हा या मतदार संघात प्रत्यक्ष विकास होण्यासाठी बदल घडवूया असे प्रतिपादन राजन तेली यांनी आंबोली येथे केले.
येथील जकातवाडी येथील स्टोन वूड हॉटेल मध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. या वेळी कार्यकर्त्यांना संबोधताना श्री.तेली म्हणाले,” या मतदार संघात एक चांगले हॉस्पिटल देखील नाही. 1998 मध्ये इथले सिविल हॉस्पिटल ओरोसला गेले.राणेंचे प्रायव्हेट हॉस्पिटल बाजूला असल्याने ते हॉस्पिटल सावंतवाडी मध्ये होणार हे क्रेडिट मिळू नये म्हणून केसरकर यांनी खो घातला. आरोग्याची परिस्थिती भयानक आहे. विधानसभेत कायदेमंडळातून इथल्या जनतेला न्याय देणे ही इथल्या लोकप्रतिनिधी ची जबाबदारी असते. प्रत्येक निवडणुकीत आंबोली माझे घर चौकुळ माझे घर असे भावनिक राजकारण करून पोळी भाजण्याचे काम केसरकर करीत आले.हॉटेल व्यवसाय आंबोलीत कमी कमी होतोय मात्र गोवा मालवण मध्ये बघा. तिलारी मधील 72 टक्के पाणी गोव्याला देतो पण परिसरातील गावांना पाणी नाही. गोव्यात हजारो तरुण इथले जातात अनेकांचे अपघात झाले. आडाळी एम आय डी सी मध्ये ६ महिन्यात उद्योग सुरु केला नाही तर तोंड दाखवणार नाही. मी 2 वेळा हरलो पण दुसऱ्या दिवसापासून काम सुरु केले. मालवण सी वर्ल्ड प्रकल्प देखील आणणारा मी होतो.१५ वर्षे त्यांना संधी दिली आता भाकरी करपली आहे. जर काम केल तर साड्या वाटपाची वेळ, देवळांना पैसे ही वेळ का येते.बेकारी,आरोग्य,शिक्षण,सर्व व्यवस्था बदलण्यासाठी एक संधी द्या संधी चे सोने करून दाखवेन. मतदार संघाचे चित्र बदलून दाखवतो.
“यावेळी रुपेश राऊळ,मायकल डिसोझा,चंद्रकांत कासार,अशोक परब, आंबोली विभाग प्रमुख बबन गावडे,उप विभाग प्रमुख संतोष पाताडे,नारायण कोरगावकर,काशीराम राऊत,सुनील राऊत,अजित नार्वेकर,पंढरी कर्पे, साक्षी राऊत,निकिता गुरव, रूपा गावडे, शशिकांत सावंत,मोहन गावडे,मधुकर गावडे,चौकुळ रुपेश गावडे,प्रकाश गावडे, तुकाराम गावडे,लक्ष्मण पाटील,विनोद गावडे,आंबोली चौकुळ मधील कार्यकर्ते उपस्थित होते.
