राज्यस्तरीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा संघाची निवड चाचणी संपन्न…

मालवण (प्रतिनिधी)

धाराशिव येथे २७ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी दि अमच्युअर खो-खो असोसिएशन सिंधुदुर्गच्या वतीने सिंधुदुर्ग संघाची निवड करण्यासाठी कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे स्पर्धा पर पडली. यावेळी सिंधुदुर्गच्या मुली व मुलांच्या संघाची निवड करण्यात आली. दोन्ही संघात प्रत्येकी १५ खेळाडूंचा समावेश आहे

या स्पर्धेचे उद्घाटन कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री. सुनील नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.देवयानी गावडे उपस्थित होत्या. संघटनेचे सचिव संजय पेंडूरकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी उपाध्यक्ष श्रीनाथ फणसेकर, खजिनदार दुर्वांक मेस्त्री, सदस्य मंदार गोसावी, बंडू सावंत, करण पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या स्पर्धेत मुलांचे पाच व मुलींच्या चार संघांनी सहभाग घेतला. या स्पर्धेतून राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी सिंधुदुर्गचा संघ निवडण्यात आला. निवडण्यात आलेल्या संघाला खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष अमित सामंत यांनी शुभेच्छा दिल्या.

निवडण्यात आलेला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा संघ पुढीलप्रमाणे – मुलांचा संघ – राजीव सावंत (पणदूर हायस्कूल), धाकू परब (डिगस हायस्कूल ), जयेश तळावडेकर (टोपीवाला ज्यु. कॉलेज मालवण), सम्यक पेंडूरकर (ओरोस हायस्कूल), अथर्व शिंदे (ओरोस हायस्कूल), चिन्मय मेस्त (रामभाऊ परुळेकर ज्यु. कॉलेज मालवण), आदित्य राठोड (ओरोस हायस्कूल), सर्वेश कदम (कुडाळ हायस्कूल व ज्यु. कॉलेज कुडाळ), गजेंद्र मोरे (चौके हायस्कूल), पार्थ वराडकर (टोपीवाला ज्यु. कॉलेज), साईश घाडी (ओरोस हायस्कूल), गौरेश परब (डिगस हायस्कूल), सिध्देश करंगुटकर (रामभाऊ परुळेकर ज्यु.कॉलेज मालवण), महेश कामते (चौके हायस्कूल), प्रशांत खडपे (वराडकर हायस्कूल कट्टा) यांची निवड करण्यात आली.

मुलींचा संघ – गार्गी मेस्त्री (डिगस हायस्कूल), अंबिका चव्हाण (वराडकर हायस्कूल कट्टा), ममता थवी (वराडकर हायस्कूल कट्टा), दक्षिणा गावडे (वराडकर हायस्कूल कट्टा), समीक्षा कामते (टोपीवाला ज्यु.कॉलेज), आर्या फोफळे (वराडकर हायस्कूल कट्टा), जान्हवी लुडबे, ईशा शिरोडकर (वराडकर इंग्लिश मिडीयम स्कूल कट्टा), निहीता केळुसकर (टोपीवाला ज्यु. कॉलेज मालवण), समिक्षा सडवेलकर, कल्पना गोसावी, चांदणी रजपुत, माधुरी गावडे (चौके हायस्कूल, चौके), दिक्षा कांबळी (टोपीवाला ज्यु. कॉलेज मालवण), अनन्या मोरे (रोझरी इंग्लिश मिडीयम स्कूल मालवण).

You cannot copy content of this page