जिथे राणे साहेबांचा पराभव झाला त्याचा वचपा मला काढायचाय…

निलेश राणें:गेल्या 10 वर्षात माझ्या आयुष्यात अनेक प्रसंग संघर्षाचे..

⚡कुडाळ ता.२३-: गेल्या 10 वर्षात माझ्या आयुष्यात अनेक प्रसंग संघर्षाचे आलेत. या 10 वर्षात राणे कुटुंबीयांनी काय काय सहन केलय हे तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही. परंतु, या 10 वर्षात मला अनेक संधी देखील आल्यात पक्षाकडून विधानपरिषद सह लोकसभेसाठी देखील विचारले परंतु, जिथे राणे साहेबांचा पराभव झाला त्याचा वचपा काढण्याची संधी शक्य झाली तर द्या एवढीच मागणी मी पक्षाकडे केली होती. ती संधी मला आज शिंदे साहेबांनी दिली आहे. गेल्या 10 वर्षात मी कशाना कशा प्रकारे मी माझ्या लोकांपर्यंत पोचत आहे. मी माझी माणस तोडली नाहीत, नाही मी माझी माती सोडली, मरेपर्यंत मी याच मातीसाठी काम करणार असे आश्वासन आज कुडाळ येथील महायुतीच्या मेळाव्यात शिंदे गटात आताच प्रवेश केलेले निलेश राणे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page