उदय सामंत ;विकासाच्या बाबतीत राणें आणि सामंत आता थांबणार नाही
⚡कुडाळ ता.२३-: शिवसेना प्रवेशाला झालेली गर्दी बघताच दोन्ही राणे विधानसभेत असल्याची पक्की खात्री झाली आहे. मात्र परिवर्तन करतांना थोड्या थोडक्यात नको तर पुढच्या पाच वर्षात फार्म भरताना विरोधकांना धडकीच भरली पाहीजे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या चेहर्यावरील हास्य आम्हाला विजयापर्यंत घेऊन जाणार मात्र या योजनेमध्ये खंड पाडण्याचे काम विरोधक करत आहेत. त्यांना या निवडणुकीमध्ये धडा शिकवा. त्यासाठी सर्वानी पेटून उठून काम कामाला लागा.असे आवाहन त्यांनी केले.तर विकासाच्या बाबतीत राणें आणि सामंत आता थांबणार नाही असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
