दीपक केसरकर यांना विजयी करून मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रेमाची परतफेड करा…

शिवसेना सचिव किरण साळी यांचे युवासेना मेळाव्यात आवाहन..

⚡सावंतवाडी ता.२३-: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या दोन वर्षांत या जिल्ह्याला जे काही दिले आहे. त्याची परतफेड मतपेटीतून करण्याची वेळ आली असून, दीपक केसरकर यांना विजयी करून त्याची परतफेड करायची आहे. असे आवाहन शिवसेना सचिव किरण साळी यांनी आज येथे केले.

यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, दीपक केसरकर यांनी सावंतवाडी मतदारसंघात केलेली विकासकामे तसेच शासनाच्या योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करा असे आवाहन देखील त्यांनी युवासेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना केले आहे.सावंतवाडी येथे आयोजित युवा सेना मेळाव्यात ते बोलत होते

You cannot copy content of this page