प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी मालवण बाजारपेठमार्गे तारकर्ली विठ्ठलमंदिर बस सुरू करावी…

सामाजिक कार्यकर्ते सुरेश बापर्डेकर यांची मागणी

*💫मालवण दि.१५-:* मालवण आगारातून तारकर्ली देवबाग मार्गावर सोडण्यात येणाऱ्या बस फेऱ्या अपुऱ्या असून या गावातील प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी मालवण बाजारपेठ मार्गे तारकर्ली विठठल मंदिर अशी एस.टी मिनी बस फेरी सुरू करण्यात यावी अशी मागणी तारकर्लीचे सामाजिक कार्यकर्ते सुरेश बापर्डेकर यांनी मालवण आगार व्यवस्थापकांकडे केली आहे. याबाबतचे निवेदन मालवण आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे यांना देण्यात आले आहे. यावेळी सुरेश बापर्डेकर यांच्यासह गणेश कोळंबकर उपस्थित होते. मालवण तालुक्यातील तारकर्ली व आजू बाजूच्या गावातील प्रवासी नागरिक तसेच गावातील विद्यार्थी शाळा आणि कॉलेज इतर कोर्सेस याकरिता मालवणला ये जा करीत असतात. मुलांच्या सोईकरिता मालवण आगारातून मिनी (पोपट) बस सकाळी व सायंकाळी चार फेऱ्या मुलांच्या व प्रवाशांच्या वेळेनुसार सोडाव्यात याव्यात. मालवण आगारातुन काही बस फेऱ्या तारकर्ली व देवबाग पर्यंत आहेत. पंरतु त्या अपुऱ्या आहेत. आणखी अशाच दोन (पोपट)मिनी बसच्या वरिष्ठ पातळीवर मागणी करून सध्या या तारकर्लीच्या आजुबाजुच्या गावातील भूतनाथ, देवली, दत्तमंदिर, वायरी, काळेथर,तारकर्ली आणि विठ्ठल मंदिर देवबाग पर्यतच्या प्रवाशी व शाळेतील मुलांना सकाळी गावातुन मालवणला शाळेत जाते वेळी जर एस.टी च्या विठ्ठल मंदिर हून सकाळी ९.३० व दुपारी १.३० आणि मालवणहून दुपारी १२.३० व ३.१५ या फेऱ्या बाजारपेठ मार्गे ये-जा करत असतील तर प्रवाशाबरोबर, शाळा कॉलेज करिता ये-जा करणा-यांना या फेऱ्यामुळे शाळा कॉलेजातील मुले आणि प्रवाशी यांना मोठया प्रमाणात फायदा होईल. आणि एस टी महामंडळाला उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होईल. तर कित्येकवेळा देवबागहुन सकाळच्या वेळी येणा-या एस.टी फेऱ्या जाग्यावरून भरलेल्या असल्याने यामधल्या गावातील प्रवाशांना व विद्यार्थ्यांना बस जाग्यावर भरुन येत असल्याने येथील गावांनी बस थांबवली जात नसल्याने शाळा कॉलेजच्या मुलाना जाण्याकरिता उशीर होतो. अगर नाहक शाळा कॉलेजचा खाडा होऊन त्यांचं नुकसान होते. तसेच शाळा कॉलेज मधील मुलांना सध्याचा अभ्यास व त्यांचे दप्तर पाहीले तर बऱ्याच दुर वरून मालवण स्टँडवर येणे अगर भरड वरून आपल्या शाळा कॉलेजला जाणे दप्तराच्या ये जा करणे यामुळे मुलांना होण्या-या गैरसोईचा पुरेपुर विचार होऊन मालवण आगार व्यवस्थापक व आगारप्रमुख यांनी विभागीय नियंत्रक सिंधुदुर्ग यांच्याजवळ पत्रव्यवहार करून आपल्या आदेशांनी सकाळी मालवण बाजारपेठमार्गे तारकर्ली विठ्ठल मंदिर तसेच विठ्ठल मंदिर तारकर्ली वायरी बाजारपेठ मार्गे मालवण स्टॅन्ड अशा साधारण चार फेऱ्याच्या ये -जा लवकरात लवकर मिनी बस सोडाव्यात अशी मागणी करण्यात आली. या मागणीला आगार व्यवस्थापक बोधे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून या मागणीचे निवेदन त्वरित वरिष्ठांकडे पाठवून त्याचा पाठपुरावा करून लवकरच तारकर्ली ग्रामस्थ प्रवाशी आणि विद्यार्थी त्यांची होणारी गैरसोय दूर होईल, असे आश्वासन बोधे यांनी दिले.

You cannot copy content of this page