शिकारीच्या उद्देशाने ठेवण्यात आले होते बॉम्ब;प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी
*💫मालवण दि.१५-:* रानटी डुकरांच्या शिकारीसाठी आचरा पारवाडी येथील डोंगरावर अज्ञाताने ठेवलेल्या बाॅंबमुळे पाळीव कुत्रे मृत्यूमुखी पडल्याच्या घटना घडली असून गेल्या काही दिवसात डुकरं मारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हात बॉम्ब पेरुन ठेवले जात असल्याची चर्चा सुरू आहे दरम्यान, संबंधित प्रशासनाने संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य परशुराम शेट्ये यांनी केली आहे. आचरा पारवाडी देवूळवाडी मध्ये पसरलेल्या डोंगरांवर अज्ञाताकडून डुकरांसाठी गावठी बाॅंब ठेवले जात आहेत.आपल्या बागेतील काजू काढण्यासाठी गेलेले माजी ग्रामपंचायत सदस्य परशुराम शेट्ये यांच्या हि बाब निदर्शनास आली. गावठी बाॅंबमुळे कुत्रेही मरुन पडले होते. या मुळे ग्रामस्थ या भागात जाण्यास घाबरत असून याचा फायदा काही काजू चोर उचलत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.या गावठी बाॅंब मुळे पाळीव जनावरांनाही धोका निर्माण होऊ शकतो या मुळे संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे
