कळसुलीतील तो पक्ष पक्षप्रवेश म्हणजे आमदारांना खुश करण्याचा प्रयत्न…

शाखाप्रमुख बाळा नाईक:काही चुका लपवण्याचा सरपंचांचा प्रयत्न ; त्या कार्यकर्त्यांचा उबाठा सेनेशी काही संबंध नव्हता..

कणकवली : कळसुली येथील कार्यकर्त्यांचा उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केलेला प्रवेश हा आपल्याच कार्यकर्त्यांना शाल घालून केलेला आहे. आमदारांना खुश करण्यासाठी आणी त्यांचा वाह… वाह… मिळवण्यासाठी तसेच स्वतःच्या काही चुका लपवण्यासाठी कळसुली सरपंच यांनी तो पक्ष प्रवेश आमदारांची दिशाभूल करण्यासाठी केलेला आहे. मुळात त्व उबाठा सेनेचे कार्यकर्तेच नव्हते. फोटोत असलेले कार्यकर्ते हे भाजपचेच कार्यकर्ते होते. त्यामुळे प्रवेश केलेल्या एकही व्यक्तीचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी कोणताही संबंध नसल्याचे शाखाप्रमुख बाळा नाईक यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

तसेच आपल्याच कार्यकर्त्यांना शाल घालू पक्ष प्रवेश दाखवण्याची वेळ ही कळसुली सरपंचांवर आलेली ही लाजिरवाणी गोष्ट आहे, असा उपरोधी टोला देखील श्री. नाईक यांनी कळसुली सरपंचांवर हाणला आहे.

You cannot copy content of this page