बांदा दाणोली रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे…

गणेश चतुर्थी पूर्वी रस्त्याची डागडुजी करण्याचे आश्वासन हवेत:२६ ऑक्टोबर पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण न केल्यास खड्ड्यात बसून आंदोलन;शामसुंदर धुरी..

बांदा/प्रतिनिधी
बांदा दाणोली रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून बांदा शहरातील रस्त्याची तर दुरावस्था झाली आहे. गणेश चतुर्थी पूर्वी रस्त्याची डागडुजी करण्याचे आश्वासन हवेत विरले असून दिवाळीच्या तोंडावर येत्या २६ ऑक्टोबर पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण न केल्यास खड्ड्यात बसून आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते शामसुंदर धुरी यांनी दिला आहे.

या रस्त्याची पूर्णपणे दुरावस्था झाली आहे. यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधिसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे देखील वेळोवेळी लक्ष वेधण्यात आले. त्यावेळी गणेश चतुर्थीपूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र गणेश चतुर्थीत खड्ड्यातूनच प्रवास करावा लागला. नवरात्रोत्सव, दसरा उत्सव देखील संपन्न झाला. आता दिवाळी सण तोंडावर आला असून अद्यापपर्यंत रस्त्याची डागडुजी करण्यासंदर्भात कोणतीही हालचाल नसल्याचा आरोप श्री धुरी यांनी केला आहे. येत्या २६ पर्यंत डागडुजी न केल्यास खड्ड्यात बसून आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

You cannot copy content of this page