आम्ही केलेल्या कामाची दखल पक्ष नेतृत्वाने घेतली…

आमदार नितेश राणे: उमेदवारी जाहीर केल्याबद्दल वरिष्ठ नेत्यांचे मानले आभार..

⚡कणकवली ता.२०-: पक्षाने दिलेले कार्यक्रम तळागाळात पोचविण्याचे काम कार्यकर्ता म्हणून मी करत आहे.जो कार्यकर्ता मेहनत करतो त्याच्यावर पक्षाच्या नेतृत्वाची नजर असते.आम्ही केलेल्या कामाची दखल पक्ष नेतृत्वाने घेतली आहे.आम्ही जनतेची आणि पक्षाची सेवा करत राहणार अशी प्रतिक्रिया आमदार नितेश राणे आज येथे दिली.दरम्यान पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, गृहमंत्री अमितभाई शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, माजी मंत्री खासदार नारायण राणे साहेब, पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब,या सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि उमेदवारी दिली त्या बद्दल मी आभार मानतो. अशी प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी दिली.

You cannot copy content of this page