श्रेय वाद माझा धर्म नाही…

सामाजिक विकासासाठी प्रामाणिक काम करणे नगरसेवकाचे कर्तव्य;परिमल नाईक यांचा नगरसेविका माधुरी वाडकर याच्यावर पलटवार

*💫सावंतवाडी दि.१५-:* श्रेय वाद हा माझा धर्म नसून प्रामाणिकपणे सामाजिक विकासासाठी काम करणे हे प्रत्येक नगरसेवकाचे कर्तव्य आहे. गेल्या चार वर्षात माझ्या प्रभाग क्रमांक ८ मधील विविध पायाभूत सुविधा तसेच विकासात्मक करोडो रुपयांच्या कामाविषयी मी स्वतः केलेला पाठपुरावा हा वेळोवेळी पार पडलेल्या मासिक सभेत व विषय समितीच्या सभेचे इतिवृत्त पडताळणी केल्यावर व संबंधित अधिकारी व नगराध्यक्ष यांच्या कडून माहिती मिळवल्यानंतर स्पष्ट होईल. तसेच ही बाब स्थानिक नागरिकांना देखील चांगली ज्ञात आहे. त्यामुळे या प्रभागातील माझ्या सहकारी नगरसेविका सौ. वाडकर यांनी कोणताही अभ्यास न करता तिसऱ्या व्यक्तीने दिलेल्या टिपण्या द्वारे माझ्या कार्यक्षमतेविषयी केलेले भाष्य हे अकालनीय, अज्ञात सदृश व अपरिपक्वतेचे लक्षण असल्याचा पलटवार नगरसेवक अँड परिमल नाईक यांनी नगरसेविका सौ माधुरी वाडकर यांच्यावर केला आहे. तसेच टीका टिपणी करण्यापूर्वी नगरपरिषदेला मिळणारा निधी, बजेट व्यवस्था, निधी विनियोग, विषय समिती वित्तीय अधिकार, मासिक सभेचे महत्त्व यांचा अभ्यास करावा असा सल्ला देखील त्यानी यावेळी दिला आहे.

You cannot copy content of this page