शिवाजी वाचन मंदिरतर्फे वाचन प्रेरणा दिन साजरा…

मालवण (प्रतिनिधी)

मालवण भरड येथील श्री शिवाजी वाचन मंदिर वाचनतर्फे जि. प. प्राथमिक शाळा रेवतळे मालवण येथे वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.

यावेळी डॉ. सुभाष दिघे यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे काय ? ते मुलांना सोप्या भाषेत समजाविले, तर श्रीधर काळे यांनी मुलांना गोष्ट सांगून पूर्वी मराठी भाषा कशी बोलली जाई ते सांगितले. वाचनालयातर्फे शाळेला गोष्टीची पुस्तके भेट देण्यात आली. रेवतळे शाळेचे शिक्षक श्री. घोडके यांनी शाळेतील मुलांना वाचनालयाची ओळख व्हावी म्हणून श्री शिवाजी वाचन मंदिर या वाचनालयाला भेट दिली. त्यावेळी वाचनालयाच्या ग्रंथपाल सौ. दुधवडकर यांनी वाचनालयाचे कामकाज कसे चालते, त्याची माहिती मुलांना करुन दिली.

तसेच सायंकाळी वाचन प्रेरणा दिनानिमित्त वाचनालयात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस विजय अटक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. हेमा परुळेकर यांनी डॉ. अब्दुल कलाम यांचे जीवनचरित्र कथन केले. डॉ. सुभाष दिघे यांनी पु. ल. देशपांडे यांचे कथाकथनाचे ऑडिओ ऐकवले तर सौ. मेधा शेवडे यांनी अरुण इंगवले लिखित वाच पुस्तके ही कविता वाचून दाखविली.

You cannot copy content of this page