मालवण सोमवार पेठ येथील हनुमान मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन…!

मालवण (प्रतिनिधी)

मालवण सोमवार पेठ येथील श्री हनुमान मंदिरात सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त दि. १९ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त दि. १९ ऑक्टोबर रोजी श्री सत्यनारायण महापूजा होणार असून दु. १२ वाजल्यापासून तीर्थप्रसाद, सायं. ६ वा. सुश्राव्य भजन, रात्री १० वा. आमने सामने २०× २० डबलबारीचा सामना बुवा संतोष कानडे विरुद्ध बुवा विजय उर्फ गुंडू सावंत यांच्यात रंगणार आहे. यामध्ये प्रश्नोत्तर व भारूड आकर्षण असणार आहे. दि. २० रोजी सायं. ७ वा. महाआरती (श्री महापुरुष बालगोपाल मंडळ रेवतळे, रात्री ८ वा. नैवेद्य चे गोड पदार्थ स्पर्धा होणार आहे. दि. २१ रोजी सायं. ७ वा. सिंधुकन्या फुगडी ग्रुप आडवण यांचा पारंपारिक फुगडी कार्यक्रम, रात्री ९ वा. दत्त माऊली संयुक्त दशावतार नाट्यमंडळ सिंधुदुर्ग यांचा मीनाक्षी सुंदरेश्वर हा दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे. दि. २२ रोजी सकाळी ९ वा. लघुरुद्र, सायं. ७ वा. वारकरी भजन, रात्री १० वा. नवरा माझा नवसाचा – २ हा चित्रपट दाखविला जाणार आहे. दि. २३ रोजी सायं. ७ वा. भजन, रात्री १० वा. घरत गणपती हा चित्रपट दाखविला जाणार आहे. दि. २४ रोजी दुपारी १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ६ वा. चित्ररथ देखाव्यासहित आणि ढोल ताशांच्या गजरात श्री गणेश मूर्तीची भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. तरी सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री हनुमान मंदिर मित्रमंडळ मालवण यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page