बौद्ध समाजातील मुलांनी अधिकारी बनावे-:प्रा. सुचिता गायकवाड…!

मालवण (प्रतिनिधी)

स्पर्धेतील यशाबद्दल केलेले सत्कार हे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहेत. सत्कारापासून प्रेरणा घेऊन बौद्ध समाजातील मुलांनी अधिकारी व्हावे, बौद्ध समाजातील मुलांचा अधिकारी म्हणून होणारा सत्कार सर्वांसाठी नक्कीच अभिमानास्पद असेल, असे प्रतिपादन इंगेट्राऊट नाईक अध्यापक विद्यालयाच्या प्राध्यापिका सुचिता गायकवाड यांनी कट्टा येथे बोलताना केले.

भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवण यांच्या वतीने कट्टा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे ६८ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने आयोजित अशोक विजया दशमी व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी इंगेट्राऊट नाईक अध्यापक विद्यालयाच्या प्राध्यापिका सुचिता गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रविकांत कदम तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रचार व पर्यटन सचिव विलास वळंजू, माजी जिल्हाध्यक्ष एम. आर. डांगमोडेकर, माजी जिल्हाध्यक्ष विश्वनाथ कदम, प्रा. डॉ. नंदू हेदुळकर, जिल्हा महिला संस्कार उपाध्यक्ष नेहा पेंडुरकर, लीना तळगावकर, प्रीतम जाधव, अपेक्षा पेंडुरकर, तालुका सरचिटणीस प्रकाश पवार, नचिकेत पवार, राजन कदम, श्यामसुंदर वराडकर, रामचंद्र चौकेकर, लक्ष्मण तळगावकर, ज्ञानदेव जाधव, भगवान जाधव, अमित पवार, शंकर कदम मिलिंद पवार, योगेश वराडकर, संग्राम कासले, सचिन कासले, रमेश कदम, संकेत पेंडुरकर, मनोज काळसेकर, गौतम पळसंबकर, अर्जुन पेंडुरकर, भानुदास तळगावकर, विनायक वराडकर, अशोक पवार, भरत पेंडुरकर तसेच गाव शाखांचे अध्यक्ष सचिव व पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रकाश पवार तर आभार प्रदर्शन नचिकेत पवार यांनी केले.

You cannot copy content of this page