कट्टा येथील वराडकर हायस्कुलमध्ये २० रोजी खो खो राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड चाचणी स्पर्धा…!

मालवण (प्रतिनिधी)

दि अमॅच्युअर खो खो असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने १८ वर्षाखालील मुले व मुली जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो- खो स्पर्धा स्पर्धा रविवार दि. २० ऑक्टोबर २०२४ रोजी वराडकर हायस्कूल, कट्टा तालुका मालवण येथे आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेतून निवडण्यात आलेला संघ २७ ते ३० ऑक्टोबर २०२४ या कालावधीत धाराशिव येथे होणाऱ्या ४३ व्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार असल्याची माहिती खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष अमित सामंत यांनी दिली आहे .

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, या स्पर्धेसाठी वयोमर्यादा १८ वर्षाखालील असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व क्लब, शाळा, संस्था आदी सर्वांना प्रवेश मिळेल. स्पर्धा प्रवेश फी रु. १००/- व २०२४-२५ संघ नोंदणी फी रु. ३००/- भरणे अनिवार्य आहे. प्रत्येक संघात १५ खेळाडूंचा समावेश असेल. स्पर्धा बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघाने अधिक माहितीसाठी व आपला प्रवेश अर्ज दि. १८ ऑक्टोबर पर्यंत सचिव संजय पेंडूरकर मोबा नंबर ९४२२३९२७९० यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष अमित सामंत यांनी केले आहे

You cannot copy content of this page