अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंती निमित्त महिलांचा होणार गौरव:नर्मदाआई महिला संस्थेचे आयोजन…
कुडाळ : दरवर्षी प्रमाणे यंदाही नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या माध्यमातून दिवाळी निमित्त विषेश प्रदर्शन व खरेदी महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. दि.१८,१९,२० आक्टोबर रोजी दुपारी ३ ते रात्री ९ या वेळात महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे हे प्रदर्शन भरणार आहे.
यावर्षीचे विषेश म्हणजे राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची ३०० वी जयंती वर्ष साजरे होत आहे. महिला सबलीकरणाचा राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी घेतलेला वसा पुढे नेत नर्मदाआई संस्था ३०० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधत महिला सबलीकरणाच्या कार्यात सक्रीय असणाऱ्या, गावातील शेवटच्या महिलेला सक्षमीकरणाच्या प्रवाहात घेऊन येणाऱ्या कुडाळ तालुक्यातील ग्रामीण भागात कार्यरत असणाऱ्या रोज १०० प्रमाणे तीन दिवसात ३०० महिलांचा राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. या महिलांच्या उमेदीला भरारी देण्यासाठी बळ देण्याचा छोटासा प्रयत्न नर्मदाआई संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.
हा तीन दिवसांचा महोत्सव नर्मदाआई संस्थेच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना आदरांजली म्हणून समर्पित करण्यात येत आहे.
आम्ही आपल्या माध्यमातून समाजातील सर्व स्तरातील महिलांनी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन सौ. संध्या तेरसे आणि सहकाऱ्यांनी केले आहे.
