जिल्हाध्यक्ष गणेश जेठे यांची जिल्हधिकाऱ्यांकडे मागणी
*💫सिंधुदुर्गनगरी दि.१३-:* कोरोना आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असून देखील जिल्ह्यातील पत्रकार हिमतीने फिल्डवर काम करत, कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सरकारी यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून सेवा करत आहेत. अशावेळी आरोग्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांप्रमाणे पत्रकारांनाही कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी लस देण्यात यावी यामध्ये वयाची अट घालू नये अशी मागणी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
