शहीद विजय साळसकर यांचे कार्य अभिमानास्पद…

आ नितेश राणे:आयटीआय संस्थेचे शहीद साळसकर यांच्या नावाने नामकरण संपन्न..

वैभववाडी प्रतिनिधी
देशाला अभिमान वाटेल असे कार्य शहीद विजय साळसकर यांनी केले आहे. त्यांचे कार्य प्रत्येक पिढीने आत्मसात केले पाहिजे. पोलीस खात्यात सर्वच अधिकारी वाईट नसतात, विजय साळसकर यांच्यासारखे अधिकारी देखील आज पोलीस खात्यात आहेत. हे देखील अभिमानास्पद आहे. विद्यार्थ्यांनी साळसकर यांच्या कर्तबगारीची माहिती घेतली पाहिजे. वैभववाडी तालुक्यात आयटीआयची नवीन सुसज्ज इमारत लवकरच उभी राहील असा विश्वास कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.
राज्य शासनाच्या वतीने वैभववाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला (आयटीआय) एडगांव चे सुपुत्र शहीद विजय साळसकर यांचे नाव देण्यात आले आहे. आयटीआय नामांतर सोहळा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते एडगांव येथे पार पडला. यावेळी तहसीलदार सूर्यकांत पाटील, गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले, सरपंच रवीना तांबे, सुधीर नकाशे, प्रमोद रावराणे, जयेंद्र रावराणे, दिलीप रावराणे, नासीर काझी, अरविंद रावराणे, भालचंद्र साठे, सुनील रावराणे, उपसरपंच प्रज्ञा रावराणे, अरविंद रावराणे, रोहन रावराणे, प्राची तावडे, राजेंद्र राणे, हुसेन लांजेकर, विनोद रावराणे, स्नेहलता चोरगे, बंड्या मांजरेकर, संजय सावंत, प्राचार्य नितीन पिंडकुरवार, अमोल राणे, गोपाळ अटक, मनोज प्रभू व पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार नितेश राणे म्हणाले, नामांतरण राज्य शासनाच्या वतीने झाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आपण मनापासून आभार मानत आहे. विजय साळसकर यांनी खऱ्या अर्थाने देशभक्ती केली. जगाला अभिमान वाटेल असे त्यांनी कार्य केले आहे. प्रत्येक पिढीने त्यांचे कार्य आत्मसात केले पाहिजे. नामांतरण फलक शेजारी साळसकर यांच्या कार्याचा माहिती फलक लावा अशा सूचना आमदार रितेश राणे यांनी दिल्या.
कर्तव्यदक्ष अधिकारी कार्य करून गेले. विजय साळसकर यांच्या आठवणी आजही माजी मुख्यमंत्री नारायण राणे साहेब सांगतात. पहिल्या पाच अधिकाऱ्यांमध्ये विजय साळसकर यांचे नाव होते. असे साहेब सांगतात. 26/ 11 चा जो हल्ला झाला. यात त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली होती. त्याचा देखील सार्थ अभिमान आहे.
पोलीस खात्यात कर्तव्यदक्ष काम करणारे खूप अधिकारी आहेत. सगळेच अधिकारी वाईट नसतात. परंतु पोलिसांबाबत माझी चुकीची बातमी बाहेर जाते. पूर्ण भाषण माझे जात नाही. साळसकर यांच्या सारखे अनेक अधिकारी देखील पोलीस खात्यात आहेत. त्याचा आम्हाला अभिमान आहे. विद्यार्थ्यांनी अशा कर्तबगार अधिकाऱ्यांचे कार्य आत्मसात केले पाहिजे. या मातीतून अनेक अधिकारी घडले आहेत. त्यांच्या कार्याचा आढावा संग्रहीत असला पाहिजे. असे सांगितले. वैभववाडी आयटीआय ची इमारत खाजगी जागेत आहे. नवीन इमारतीसाठी अधिकाऱ्यांनी देखील पाठपुरावा केला पाहिजे. परत महायुतीचे सरकार येणार आहे. त्यामुळे आयटीआयची सुसज्ज इमारत उभी राहील असे सांगितले. विजय साळसकर यांच्या नावाप्रमाणे अधिकाऱ्यांनी देखील या आयटीआय मध्ये काम केले पाहिजे. असे नितेश राणे यांनी सांगितले. जयेंद्र रावराणे, तहसीलदार सूर्यकांत पाटील, प्रमोद रावराणे यांनी मनोगत व्यक्त केले. साळसकर नाव असलेल्या फलकाचे नामांतरण आमदार नितेश राणे व विजय साळसकर यांचे काका वसंत साळसकर यांच्या हस्ते करण्यात आले. एडगांव येथील विजय साळसकर यांच्या स्मारकाला आमदार नितेश राणे यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page