वेंगुर्ले येथे २८ ऑक्टोंबर ला “भव्य खुली आकाश कंदील” स्पर्धा…

जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन..

वेंगुर्ले : प्रतिनिधी
वेंगुर्ले येथे शिवसेना जिल्हा समन्वयक तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार २८ ऑक्टोंबर रोजी “भव्य खुली आकाश कंदील स्पर्धा” आयोजित केली आहे. विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन सचिन वालावलकर मित्र मंडळाचे अध्यक्ष संतोष परब यांनी केले आहे.
वेंगुर्ले शहरातील श्री देव रामेश्वर मंदिर समोर ही स्पर्धा २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. स्पर्धेतील प्रत्येक सहभागी स्पर्धकाला भेटवस्तू देण्यात येणार आहे. स्पर्धेमध्ये स्पर्धकांना विनामूल्य प्रवेश आहे. विजेत्या प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे ५००० रुपये, ४००० रुपये आणि ३००० रुपये बक्षीस तर उत्तेजनार्थ प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे २००० रुपये, १००० रुपये व ५०० रुपये बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
तरी अधिक माहितीसाठी संदीप परब ९४२३३००८४१ या क्रमांकावर संपर्क साधावा आणि नाव नोंदणी करावी असे आवाहन सचिन वालावलकर मित्रमंडळाचे अध्यक्ष संतोष परब यांनी केले आहे.

You cannot copy content of this page