वैभववाडी प्रतिनिधी
उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेच्या वैभववाडी तालुक्यातील मोठा कार्यकर्ता जिल्हा सरचिटणीस स्वप्निल धुरी यांनी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला कणकवली विधानसभेत पक्षाच्या संघटना कार्यपद्धतीवर नाराज तसेच कणकवली विधानसभेत लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर संघटनेत पसरलेली मरगळ झटक्यात पक्षाचे वरिष्ठ नेते अपयशी ठरल्यामुळे कणकवली विधानसभेत संघटने कडे वरिष्ठांचा दुर्लक्ष होत असल्यामुळे आपण हा राजीनामा देत असल्याचे धुरी यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे. विधानसभा तोंडावर असताना देखील या मतदारसंघात वरिष्ठांकडून कोणत्या प्रकारचे नियोजन होत नाही लोकसभा निवडणुकीत तालुक्यातील अनेक बुधवर आम्ही का पडलो याकडे वरिष्ठ नेत्यांचा क्षण नसलेले आपण राजीनामा देत असल्याचे कुठले आहे.
धुरी यांच्यासह ठाकरे शिवसेनेतील अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांची घुसमट होत असून ही घुसमट धुरी यांच्या राजीनामामुळे उघड झाली आहे. धुरी गेले दहा वर्षापेक्षा जास्त वर्ष शिवसेनेत काम करत आहे शिवसेनेचा स्पष्ट वक्ता म्हणून त्यांची ओळख संपूर्ण जिल्हाभर आहे लोकसभेच्या वेळी त्यांची प्रमुख वक्ता म्हणून निवड झाली होती. तालुक्यातील कोळपे जिल्हा परिषद मतदार संघात धुरी त्यांचे वर्चस्व असून मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पक्षात नेत्यांच्या नाराजी मुळे आपला राजीनामा युवा जिल्हा प्रमुख त्यांच्याकडे राजीनामा दिला आहे वरिष्ठ नेत्यांनी त्यांची नाराजी दूर न केल्यास ते पुढील निर्णय घेऊ शकतात असे बोलले जात आहे.
उबाठाचे युवासेना जिल्हा सरचिटणीस स्वप्नील धुरी यांचा राजीनामा…
