⚡सावंतवाडी ता.११-: दाणोली बांदा रस्त्याचे आणि मजबुतीकरण कामाचे शुक्रवारी ऑनलाईन भूमिपूजन झाले मात्र रस्त्यासाठी घरे व जमीन जाणाऱ्या ग्रामस्थांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून भरपाई देण्यात न आल्याने काही ग्रामस्थांनी भूमी पूजनासाठी सातोळी बावळट येथे उभारलेला मंडप शुक्रवारी पहाटे उखडून टाकला तसेच काही मंडपाचा भाग जाळूनही टाकला.
जोपर्यत ग्रामस्थांच्या शंकांचे निरासरण होत नाही तोपर्यंत या महामार्गाचे काम सुरू करण्यात येऊ नये अशा स्पष्ट सूचना शालेय शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यानी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या. तसे लेखी पत्र हे सार्वजनिक बांधकाम विभागाने ग्रामस्थांनाही दिले.
तालुक्यातील दाणोली ते बांदा या राष्ट्रीय महामार्गाच्या तब्बल 16.30 किलोमीटर लांबीच्या दुपदरी आणि काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन आज सकाळी अकरा बाबता सातोळी बावळाट येथे ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आले होते. त्यासाठी 128 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे सदरचा रस्ता तू पदरीकरण असल्याने त्याची रुंदी वाढणार आहे.यामध्ये सातोळी बावळट ग्रामस्थांची 25 घरे तसेच जमीन बाधित होणार आहे. रस्त्याचे काम करण्याआधी घरे व जमीन बाधित होणाऱ्या ग्रामस्थांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांची होती परंतु ग्रामस्थांना भरपाई न देता भूमिपूजन करून या रस्त्याचे काम सुरू करण्याचा घाट सार्वजनिक बांधकाम विभागाने घातला होता. यासाठी स्थानिक पातळीवर सातोळी बावळट येथे बांधकाम विभागाने भूमिपूजनासाठी मंडप उभारला होता. याची कल्पना स्थानिक ग्रामस्थांना होताच त्यांनी याला विरोध केला. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास उभारलेला मंडप अज्ञाताकडून उखडून टाकला तर काही मंडपाचा भाग जाण्यातही आला. भूमिपूजनाचा हा कार्यक्रम शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार होता परंतु ग्रामस्थांचा विरोध आणि मंडप जाळण्यात आल्याचा प्रकार मंत्री केसरकर यांची कानावर येतात त्यांनी भूमिपूजनाची जागा बदलून ऑनलाईन भूमिपूजनाचा कार्यक्रम माडखोल साई मंदिरात घेतला त्यावेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला ग्रामस्थांच्या शंकांचे निरासन होत नाही तोपर्यंत काम करू नये अशा सूचना दिल्या. या कार्यक्रमाला सातोळी बावळट
सरपंच सोनाली परब यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.तर
या दुपदरीकरण कामामध्ये 25 घरे व जमीन बाधित होत असताना शासनाकडून भरपाई दिली नाही आणि काम सुरू करण्याचा घाट घातला आहे हे चुकीचे असल्याचे सांगितले.जोपर्यत नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत आम्हा ग्रामस्थांचा स्पष्ट विरोध आहे अशी भूमिका मांडत सार्वजनिक बांधकाम विभागाने ग्रामस्थांची किंवा ग्रामपंचायतीची परवानगी न घेता मंडप उभारला हे योग्य नाही असे सांगितले. यावेळी दया परब स्वप्निल परब आदी ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाला मंत्री केसरकर याच्यासोबत माजी आमदार राजन तेली शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख बबन राणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वैभव सगरे आदी उपस्थित होते.
केसरकरांनी दिली भरपाई..
ऑनलाइन भूमिपूजन कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह राज्यस्तरीय मंत्री उपस्थित राहणार असल्याने सात्विक भावनात येथे मोठा मंडप उभारण्यात आला होता. ग्रामस्थांचा उरत असल्याने हा मंडप अज्ञाताकडून उकडून जाण्यातही आला यामध्ये मंडप मालकाचे मोठे नुकसान झाले. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेत मंत्री केसरकर यांनी नुकसान भरपाई म्हणून संबंधित मंडप मालकाला 60000 रुपयाचा धनादेश तात्काळ सपुर्त केला.
