ये तो अभी सुरुवात है… आगे आगे देखो क्या होता है…

रुपेश राऊळ : अन्यथा २०२५ मध्ये राजन तेली, विशाल परब, संजू परब कोपऱ्यात फेकले जातील हे कळणारे नाही..

सावंतवाडी ता.१०-: केसरकरांनी आजपर्यंत राजकारणात आपल्या बाजूला असलेल्या माणसाला चिरडण्याचे काम केले आहे. याचा अनुभव मला देखील गेल्या आठ वर्षात आलेला आहे, त्यामुळे मळगाव सरपंचांवर केसरकरांनी आणलेला अविश्वास ठरावानंतर तरी भाजपच्या लोकांनी केसरकर यांच्या कार्यपद्धतीबाबत विचार करावा. अन्यथा “ये तो अभी सुरुवात है..आगे आगे देखो क्या होता है” असा सल्ला ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी भाजपला दिला आहे.

दरम्यान आजपर्यंत केसरकर यांनी राजकारण स्वार्थासाठीच केले आहे. त्यामुळे ते आता निवडणुकीसाठी भाजप पूरकुर फायदा करून घेतील. मात्र 2025 मध्ये राजन तेली, विशाल परब, संजू परब हे कुठल्या कोपऱ्यात फेकले गेलेले असतील, ते त्यांना देखील कळणार नाही, असा टोलाही यावेळी राऊळ यांनी हाणला.त्यामुळे आता भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी विचार करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

You cannot copy content of this page