पंधरा वर्षात विकास करू शकले नाहीत ते चार दिवसात विकास काय करणार…?

रुपेश राऊळ: राजन तेलींनी अर्धवट माहिती देऊ नये, भ्रष्टाचारातील त्या शुक्राचार्यचे नाव जाहीर करावे…

⚡सावंतवाडी ता.०८-: पंधरा वर्ष आमदार, आठ वर्षे मंत्रीपद भोगून जो माणूस सावंतवाडीचा विकास करू शकत नाही, तो माणूस चार दिवसात काय विकास करणार..? असा सवाल उबाठा विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी केला आहे. साडेचार वर्ष कोमात असलेले केसरकर आता निवडणुकीच्या तोंडावर झोमात आल्याची अशी टीका रुपेश राऊळ यांनी आज येथे केली.

दरम्यान राजन तेली यांनी सिंधू रत्न मध्ये ट्रान्सफॉर्मर देण्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता, त्या आरोपात तथ्य असून राजन तेली यांनी अर्धवट माहिती देण्यापेक्षा त्यांनी वेंगुर्ल्यातील त्या शुक्राचार्य चे नाव जाहीर करावे असे आव्हान त्यांनी यावेळी तेली यांना केले. ते सावंतवाडी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

राऊळ पुढे म्हणाले की, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खासदार अमोल कोल्हे यांनी केसरकारांना सावंतवाडी मतदारसंघातून त्यांना जोरदार चपराक दिली आहे, गेले पंधरा वर्षे आम्ही हे ताज हॉटेलची गजाली ऐकतोय. परंतु केसरकर हे किती खोटारड्यात हे संपूर्ण महाराष्ट्रात बदनाम झाल्याचं जयंत पाटील यांच्या वक्तव्यावरून दिसून आल्याचं स्पष्ट झाले, अशीही राऊळ यांनी यावेळी टीका केली. दरम्यान निवडणूक आले की मोठंमोठ्या घोषणा भूमिपूजन करायचा मात्र निवडणुका झाल्या की मात्र ते प्रकल्प ही नाही आणि केसरकरही नाही, त्यामुळे किती आता लोकांची दिशाभूल करणार हे आता लोकांनी ओळखलेल आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जनता यांना जागा दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा श्री राऊळ यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page