सावंतवाडी शहरातील रस्ते म्हणजे प्रशासकीय कारभारावर पडलेला काळा डाग…!

बबन साळगावकर:घंटागाडी अकरा बारा वाजले तरी लोकांच्या घरापर्यंत पोहोचतच नाही, यामागे हात कोणाचा…?

⚡सावंतवाडी ता.०८-: शहरातील विविध समस्यांबाबत सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष श्री.बबन साळगावकर यांनी पालिका प्रशासनावर आगपाखड करत जोरदार टीका केली आहे, प्रशासनाच्या गलथान करभाराचा पाढाचं त्यांनी वाचवा आहे.

श्री. साळगावकर म्हणाले की,
काही दिवसापूर्वी सावंतवाडी शहरांमध्ये आंदोलन केल्यानंतर तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली, परंतु नागरिक, रिक्षाचालक, वाहनचालक यांच्या यातना काही संपलेल्या नाहीत, भ्रष्ट अधिकारी भ्रष्ट ठेकेदारांची कारवाई झालेली नाही, मुख्याधिकाऱ्यांनी पूर्ण याकडे दुर्लक्ष केलेलं आहे, स्वच्छतेच्या बाबतीतही अशम्य गलथानपणा सुरु आहे, स्वच्छतेच्या बाबतीमध्ये शहरामध्ये घडी बसवलेल्या शहरातील व्यवस्था कोलमडली असून सकाळच्या वेळेत घंटागाड्या दारोदारी कचरा गोळा करण्यासाठी जायच्या या व्यवस्थेमध्ये कोलमडून टाकण्यामध्ये कोणाचा हात आहे..? घंटागाडी अकरा बारा दुपारच्या एक वाजेपर्यंत लोकांच्या घरापर्यंत पोहोचतच नाही, सरकारी कर्मचारी नोकरदार वर्गा नोकरीच्या निमित्ताने सकाळीच बाहेर पडून जातात, यांची घंटागाडी पोहोचते एक वाजता परिणामी शहरांमध्ये ठिकठिकाणी कचरा दिसत आहेत. मुख्याधिकाऱ्यांना पुन्हा इशारा देत आहोत गलथान कारभाराची सुधारणा करा, प्रशासकीय बैठका घेऊन जुन्या फाइल्सवर लक्ष टाका, व्यवस्था कशी होती, त्यावेळी शहर स्वच्छता होती. आज करोड रुपये स्वच्छतेवरती खर्च घालून स्वच्छता का होत नाही..? शहरातील कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी फिरत आहेत, यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे, स्ट्रीट लाईट ठीक ठिकाणी बंद पडलेल्या दिसतात. शहरातील सार्वजनिक रस्ते, शौचालय, स्ट्रीट लाईट , कुत्र्यांचा बंदोबस्त हे प्रश्न सोडवा, अन्यथा पुन्हा नगरपरिषदेला धडक द्यावी लागेल आणि त्याची पूर्ण जबाबदारी प्रशासक म्हणून प्रशासनावरती राहील, असे साळगावकर यांनी नगरपालिका प्रशासनाला सुनावले आहे.

You cannot copy content of this page