प्रथमेश तेली झाले सावंतवाडीकर…!

मतदार यादीत केली नोंद, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून बजावणार मतदानाचा हक्क..

⚡सावंतवाडी ता.०८-: भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली हे आता सावंतवाडीकर झाले आहेत, नुकतेच त्यांनी वेंगुर्ले येथे आपले नाव नोंदविले आहे, त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर सुरू असलेल्या स्थानिक आणि बाहेरचा हा मुद्दा आणखीनच जोर धरणार आहे.

श्री.प्रथमेश तेली यांचे वडील हे पुन्हा एकदा आगामी होणाऱ्या निवडणुकीत आपले नशीब आजमावणार आहे. त्या पद्धतीने त्यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात आपले काम सातत्याने सुरू ठेवले .दरम्यान या ठिकाणी भाजपमध्ये अनेक इच्छुकांची गर्दी आहे. त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळते, याकडे लक्ष आहे. परंतु प्रथम तेली यांनी आपलं नाव आता सावंतवाडी मतदारसंघात नोंदवले आहे. याबाबतची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

You cannot copy content of this page