बांदा नवरात्रोत्सव गांधी चौक मित्रमंडळाच्या वतीने विविध स्पर्धाचे आयोजन…

बांदा/प्रतिनिधी
येथील सार्वजनिक नवरात्रोत्सव गांधी चौक मित्रमंडळाच्या वतीने विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व स्पर्धा ८ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता संपन्न होणार आहेत.
भव्य खुली सिनेगीत (करा ओके) ठेवण्यात आली असून या स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे १००००, ५०००, ३००० रुपये रोख तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येणार आहेत. ही स्पर्धा उद्योजक अमेय पावसकर यांनी पुरस्कृत केली आहे. नाव नोंदणीसाठी धनेश नाटेकर (मो. ९४०५४१६८६०) किंवा अनिकेत येडवे (मो. ८३९०२४१८४२) यांच्याशी संपर्क साधावा.
ग्रुप डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली असून स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे २५००, १५००, १००० रुपये रोख पारितोषिक तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येणार आहे. ही स्पर्धा चेतन मुंगी यांनी पुरस्कृत केली आहे.
१६ वर्षावरील गटासाठी रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे ४००१, २००१, १००१ रुपये रोख पारितोषिक तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येणार आहे. ही स्पर्धा श्री स्वामी समर्थ मिल शेर्लेचे मालक बिपीन येडवे यांनी पुरस्कृत केली आहे. नावनोंदणीसाठी प्रथमेश गोवेकर (मो. ९१५६८६९०१४) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page