पालकांच्या मागणीनुसार शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिक्षणमंत्री केसरकर यांची भेट घेत दिले निवेदन…
मालवण दि प्रतिनिधी
शाळांची सकाळच्या सत्रातील बदललेली वेळ पुन्हा पूर्ववत करावी. अश्या स्वरूपात पालकांच्या वाढत्या मागण्या लक्षात घेता कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघ प्रमुख श्री. बबन शिंदे, मालवण तालुका प्रमुख श्री.राजा गांवकर, शिवसेना कार्यकर्ते साईश घुर्ये यांच्या वतीने शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना निवेदन देण्यात आले.
शाळांची सकाळची वेळ त्यावेळी काही कारणांनी बदलली. त्यामुळे मुलांच्या जेवणाच्या वेळा, खेळण्याच्या वेळा बदलल्या मात्र बदललेल्या वेळा सोईच्या ठरण्यापेक्षा मुलांना त्रासदायक ठरत आहेत. अशी भुमिका अनेक पालकांनी व्यक्त केली. निवेदने सादर केली. यां सर्वांचा विचार करता शिवसेना कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे, मालवण तालुकाप्रमुख राजा गांवकर, साईश घुर्ये यांच्या वतीने शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना निवेदन देण्यात आले. याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. त्यावर शिक्षण मंत्री माननीय दीपक भाई केसरकर यांनी लवकरच शाळेचा वेळ बदलण्यासंदर्भातील जी.आर. आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी काढण्यात येईल असे आश्वासन दिले व जी.आर काढण्याबाबतची कार्यवाही चालू केली.
