राजन तेली यांच्या प्रवेशाची कल्पना नाही, मात्र शिवसेनेत आले तर आम्ही स्वागत करू…

*रुपेश राऊळ:पण केसरकरांच्या पराभवासाठी आम्ही संपूर्ण ताकद लावणार..

⚡सावंतवाडी ता.०८-: माजी आमदार तथा भाजपचे नेते राजन तेली शिवसेनेत येतायेत की नाही हे मला माहीत नाही, त्याबाबत वरिष्ठ निर्णय घेतील परंतु एखादा व्यक्ती जर शिवसेनेत ताकतीला बळ देण्यासाठी येत असेल तर आम्ही त्यांचं निश्चितच स्वागत करू, अशी प्रतिक्रिया विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी पत्रकारांशी विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना उत्तर दिले.

दरम्यान या संदर्भात लवकरच वरिष्ठांकडून काय माहिती मिळाली तर आपण तुम्हाला देऊ अशी पुष्टीही श्री.राऊळ यांनी जोडली.दरम्यान
मंञी केसरकर यांच्या पराभवासाठी मात्र आम्ही सगळे ताकद लावणार असल्याचे देखील श्री.राऊळ यांनी यावेळी स्पष्ट केले.

You cannot copy content of this page