परशुराम उपरकर यांच्या माध्यमातून सावंतवाडी, कुडाळ विधानसभा मतदारसंघात बेंचची व्यवस्था…!

सावंतवाडी
माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या माध्यमातून सावंतवाडी विधानसभा तसेच कुडाळ मालवण विधानसभेत बसण्याचे बाक वाटप करण्यात आले आहेत. हे बाक शहरात गावात पर्यटन स्थळी मोक्याच्या ठिकाणी तीर्थ स्थळ येथे बसविण्यात येणार आहेत.


माजी आमदार परशुराम ऊर्फ जीजी उपरकर यांच्या सौजन्याने तसेच सामाजिक कार्यकर्ते आशिष सुभेदार राजेश टंगसाळी विनोद सांडव आप्पा मांजरेकर सचिन मयेकर आबा चिपकर बाळा बहिरे मंदार नाईक संदीप लाड यांच्या माध्यमातून सावंतवाडी व कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघात हे बाक बसविण्यात येणार आहेत. प्रत्येक तालुक्यात सत्तर ते ऐंशी बाक बसविले जाणार आहेत शिवाय पर्यटन स्थळ तीर्थ स्थळ गार्डन उद्याने मोक्याच्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी नाक्यावर शाळेच्या आवारात ही बाक बसविले जातील अशी माहिती त्यानी दिली. उपरकर यांच्या सार्वजनिक उपक्रमाचा भाग म्हणून या बाकांचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सावंतवाडी मतदार संघात आशिष सुभेदार कुडाळ मालवण मतदार संघात राजेश टंगसाळी यांच्या मदतिने हे बाक बसविले जातील. जी जी उपरकर यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

You cannot copy content of this page