डामरे ग्रामपंचायत येथे आयोजित आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद..

कणकवली : डामरे ग्रामपंचायत मध्ये संजीवनी हॉस्पिटल कणकवली व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मार्फत मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी डॉ विद्याधर तायशेटे व त्यांचे कर्मचारी वृंद तसेच ग्रामपंचायत डामरे यांनी या शिबिराला मोलाचे सहकार्य केले. याप्रसंगी गावचे सरपंच किरण कानडे, उपसरपंच सागर साटम , ग्रामपंचायत सदस्य विनिता सावंत, पोलीस पाटील विश्वास सावंत, ग्रामसेविका संगीता पाटील, ग्रामपंचायत माजी सरपंच बबलू सावंत, माजी सरपंच भास्कर सावंत, माजी उपसरपंच दिगंबर जाधव, विजय सावंत, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व तंटामुक्ती अध्यक्ष प्रदीप जाधव, युवा कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page