हर्षदा थोरबोले गायन प्रकारात प्रथम…

वेंगुर्ला प्रतिनिधी- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचे विभागीय केंद्र कोल्हापूर अंतर्गत २२वा विभागीय युवक महोत्सव २०२४ कणकवली कॉलेज येथे संपन्न झाला. यात बॅ. खर्डेकर महाविद्यालयातील (७४०१- ए) अभ्यास केंद्रावरील प्रथम वर्ष वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी हर्षदा हरिश्चंद्र थोरबोले हिने भारतीय सुगम संगीत (गायन) या प्रकारात पथम क्रमांक प्राप्त केला.

  या युवक महोत्सवामध्ये विभागीय केंद्रांतर्गत कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी सहभागी झाले होते. कु.हर्षदा हिच्या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी प्रा.जयकुमार देसाई, चेअरमन प्रा.डॉ.मंजिरी अजित मोरे, पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई तसेच केंद्रप्रमुख व बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.बी.चौगले, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे. हर्षदा हिला डॉ.जी.पी धुरी आणि डॉ.सचिन परुळकर यांनी मार्गदर्शन केले.
You cannot copy content of this page