तालुकास्तरीय स्पर्धेत सिंधुदूर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलचे सुयश…

कुडाळ : स्वच्छता ही सेवा २०२४ या अभियानातंर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेने दिनांक २४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२४ या कालावधीमध्ये आयोजित केलेल्या तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीअम स्कूल, वेंगुर्ला या शाळेने यश संपादन केले.
यामध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धेत इयत्ता आठवी ते दहावी गटांमध्ये कुमारी श्रेया युवराज मराठे व कुमारी सिद्धी भरत गावडे यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तसेच बुधवार दिनांक २५ सप्टेंबर या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या ‘कच-यातून कल्पकता स्पर्धा’ या स्पर्धेमध्ये मध्ये इयत्ता पहिली ते पाचवी गटांमध्ये आलेले पहिले तिन्ही क्रमांक हे सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीअम स्कूलने प्राप्त केले असून प्रथम क्रमांक कुमारी आराध्या रमेश मुणनकर, द्वितीय क्रमांक कुमारी सिया भरत गावडे तर तृतीय क्रमांक श्रेयांश सचिन सावंत यांनी पटकाविला आहे. तसेच 27 सप्टेंबर रोजी स्वच्छ चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये इयत्ता पहिली ते पाचवी या गटामध्ये पाचवीतील विद्यार्थिनी कुमारी सिया भरत गावडे हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. या स्पर्धेत वेंगुर्ला तालुक्यातील सर्व मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी भाग घेतला होता.
विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष.इर्शाद शेख, संचालक.प्रशांत नेरूरकर, सेक्रेटरी .दत्तात्रय परुळेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मनिषा डिसोझा, तसेच शि‌क्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page