पैशाच्या जीवावर “बाउन्सर” आणून कोण मस्ती करत असेल तर ते चालू देणार नाही…

मंत्री केसरकर यांचा इशारा: कोणीही माझ्या विरोधात बॅनरबाजी केली, तरी लोक माझ्यासोबत आहेत..

⚡सावंतवाडी ता.०३-: माझ्या मतदारसंघात टेंडर मिळवण्यासाठी ठेकेदारांकडून बाऊन्सर आणून दादागिरी केली जात असेल तर ती मी मुळीच खपवून घेणार नाही तसेच पैशांची मस्ती चालू देणार नाही अशा कोणत्याही ठेकेदाराला मी कधीच माफ करणार नाही असा इशारा मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिला.दरम्यान माझ्या मतदारसंघातील लोक चांगले ओळखतात मी कामे केली नसती तर मला तीन वेळा आमदार म्हणून निवडून दिले नसते त्यामुळे कोणीही बॅनरबाजी केली तरीही मला फरक पडत नाही लोक माझ्यासोबत आहेत बोलणाऱ्या लोकांना कामे नसल्यामुळे ते बोलत आहेत. श्री केसरकर आज ऑनलाईन आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते पुढे म्हणाले मल्टीस्पेशालिटी आणि सावंतवाडी बस स्थानक हा प्रश्न माझ्या आश्वासनापैकी पैकी राहिला आहे. तो सोडवणे माझे कर्तव्य आहे परंतु मल्टीस्पेशालिटी संदर्भात वारंवार माझे प्रयत्न सुरू असताना आजही राजघराण्याकडून काही सह्या शिल्लक राहिल्या असल्याने तो प्रश्न निकाली लागण्यास वेळ लागत आहे येत्या दोन दिवसात त्यावर सह्या न झाल्यास स्पेशालिटी हे दुसरीकडे स्थलांतरित केल्याशिवाय पर्याय नाही तर चालकाचे काम हे बीओटी तत्त्वावर लवकरात लवकर सुरू होणार आहे.

You cannot copy content of this page