सुंदर गाव स्पर्धेत मालवण तालुक्यातून वायंगवडे प्रथम…

मालवण (प्रतिनिधी)

आर. आर. पाटील सुंदर गाव २०२२-२३ स्पर्धेत मालवण तालुक्यातून वायंगवडे ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या ग्रामपंचायतीला ८७ गुण प्राप्त झाले आहेत. या ग्रामपंचायतीचे परीक्षण सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली समितीने केले होते. प्रथम क्रमांक आल्यामुळे १० लाख रुपयांचे पारितोषिक या ग्रामपंचायतीला मिळणार आहे.

या बक्षिसाच्या माध्यमातून गाव पातळीवर नवीन विकासकामांसाठी जास्तीचा निधी प्राप्त होणार आहे. मालवण तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल सरपंच विशाखा सकपाळ, उपसरपंच विनायक परब, ग्रामसेवक कृष्णाजी दळवी, विष्णू मेस्त्री, सुषमा परब, सानिका राणे, सानिका सकपाळ, आनंद सावंत, मयुरी परब, कर्मचारी स्वप्नील सुद्रिक, भक्ती परब, विनेश परब आदींचे अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page