Headlines

मळगाव इंग्लिश स्कूल मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती साजरी…

⚡सावंतवाडी ता.०२-: दरवर्षी २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती साजरी केली जाते. त्यांचा जन्मदिवस म्हणून देशात आणि जगभरात हा दिवस साजरा केला जातो. ब्रिटिशांच्या राजवटीविरुद्ध भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या प्रसिद्ध नेत्यांपैकी एक म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांना ‘महात्मा गांधी’ म्हणून संबोधले जाते. लोक प्रेमाने त्यांना ‘बापू’ असेही म्हणतात. तसेच गांधीजींना ‘राष्ट्रपिता’ मानले जाते. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. सामाजिक आणि राजकीय परिवर्तनासाठी अहिंसा, सविनय कायदेभंग व सत्य हे तत्त्व सामर्थ्यवान साधने म्हणून वापरणाऱ्या गांधीजींना श्रद्धांजली देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
सावंतवाडी तालुक्यातील मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन महात्मा गांधी यांची आवडती प्रार्थना रघुपती राघव राजाराम सादर करण्यात आली त्यानंतर विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारातील साफसफाई केली.
यावेळी मळगाव इंग्लिश स्कूल चे मुख्याध्यापक श्री.एम.बी.फाले ,पर्यवेक्षक एस.व्ही.कदम, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

You cannot copy content of this page