कंटेंटमेन्ट झोनचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करणार-: रामदास झळके…

*💫वैभववाडी दि.१२-:* तालुक्यामध्ये कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे.कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी शासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे.कोरोना सक्रिय रुग्ण आढळलेल्या 37 ठिकाणी कंटेंटमेन्ट झोन जाहीर करण्यात आला आहे .कंटेंटमेन्ट झोनचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती वैभववाडी तहसीलदार रामदास झळके यांनी दिली आहे. वैभववाडी तहसीलदार कार्यालय येथील दालनात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल पवार,आरोग्य विस्तार अधिकारी आनंदा चव्हाण आदी उपास्थित होते. पुढे तहसीलदार झळके म्हणाले,दिगशी गावामध्ये आता पर्यंत 28 व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या आहेत.त्यापैकी एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही.आता पर्यंत एवढया मोठ्या संख्येने कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण कोणत्याही गावात आढळलेले नाहीत.त्यामुळे दिगशी गाव संपूर्ण कंटेंटमेन्ट झोन जाहीर करण्यात आला आहे.या गावातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत.सोमवारी तहसीलदार रामदास झळके यांनी दिगशी गावातील सोलकरवाडी येथील कंटेंटमेन्ट झोनची पाहणी केली. यावेळी उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. पाटील,वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव,मंडळ अधिकारी प्रमोद पीळणकर,पावसकर,तलाठी आमब्रसकर,कोतवाल सलीम,आदी उपस्थित होते. आतापर्यंत वैभववाडी तालुक्यात 120 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत.होम क्वारंटटाईन 46,सांगूळवाडी कोविड सेंटर 50,ओरोस जिल्हा रुग्णालय 18,खाजगी रुग्णालय 4,जिल्ह्या बाहेरील उपचार 2 असे रुग्ण उपचार घेत आहेत. वैभववाडी तालुक्यातील सर्व गावांमध्ये आरोग्य विभाग, ग्राम सनियंत्रण समितीच्या माध्यमातून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे.वैभववाडी नगरपंचायत हद्दीमध्ये नगरपंचायत व पोलीस विभागाच्या वतीने कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे तहसीलदार झळके यांनी सांगितले.

You cannot copy content of this page