“ते” बॅनर लावून शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांची बदनामी करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा…

मंत्री केसरकर यांचे समर्थक आक्रमक: पोलिसांची भेट घेत कारवाईची केली मागणी..

⚡सावंतवाडी ता.०२-: सावंतवाडी शहरात शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांची बदनामी करणारे बॅनर अज्ञाताकडून लावण्यात आले, याबाबात मंत्री केसरकर यांचे समर्थक आक्रमक झाल्या असून याबाबत शिवसेना शिष्टमंडळाने जिल्हाप्रमुख अशोक दळवींच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांची भेट घेऊन चर्चा केली व बॅनर लावणाऱ्या अज्ञातांवर तात्काळ कारवाईची मागणी केली.

या निवेदनात असे म्हटले आहे की,
शिक्षण मंत्री दिपकभाई केसरकर यांची वैयक्तिक बदनामी करणारे बॅनर सावंतवाडी शहरात व सावंतवाडी तालुक्यातील इतर भागात लावण्यात आलेले आहेत. सदरचे बॅनर हे. शिक्षणमंत्री महोदयांच्या राजकिय व सामाजिक कारकीर्दीला बदनामीकारक ठरत आहेत व हे प्रकार यापुढे वारंवार घडण्याची शक्यता आहे. दिपकभाई केसरकर हे आमच्या पक्षाचे प्रमुख नेते असुन त्यांची यापुढे अशारितीने बदनामी कोणा अज्ञात व्यक्तीकडुन केली गेली तर शिवसेना पक्ष कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही व यापुढील होणा-या गंभीर प्रसंगास पुर्णपणे आपले पोलिस प्रशासन व ज्याठिकाणी हे बदनामीकारक बॅनर लावले गेले त्याठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्था जबाबदार राहतील. असे त्यांनी यावेळी पोलिसांकडे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनावर शिवसेना जिल्हाप्रमुख मा.अशोक दळवी, उपजिल्हा प्रमुख श्री.विनायक दळवी, शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे, शिवसेना महीला जिल्हा आघाडी प्रमुख ॲड.सौ.निता सावंत कविटकर, माजी नगराध्यक्ष श्री.राजन पोकळे, शहरप्रमुख श्री.खेमराज कुरतडकर, उप तालुकाप्रमुख श्री.गजानन नाटेकर, शहरप्रमुख सौ.भारती मोरे, माजी नगराध्यक्षा अनारोजिन लोबो यांनी सह्या केल्या.

You cannot copy content of this page