*💫बांदा दि.११-:* विकेंड लॉकडाऊन असल्याने बांदा शहरात रविवारी अत्यंत साधेपणाने रंगपंचमी साजरी करण्यात आली. नेहमीप्रमाणे डीजे व ढोलताशाना फाटा देत तरुणाईने रंगोत्सव साजरा केला. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी शहरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. बांदा शहरात पंधरा दिवस शिमगोत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षी कोरोनाचा सामूहिक संसर्ग वाढल्याने राज्य शासनाने राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर शहरात जाहीरपणे रंगपंचमी साजरी करण्यावर मर्यादा आल्या. शहरातील बहुसंख्य कुटुंबियांनी कोरोना नियम पाळत घरातच रंगपंचमी साजरी केली. विकेंड लॉकडाऊन असल्याने शहरात तुरळक वाहनांची वर्दळ होती.
बांद्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने रंगपंचमी साजरी…
