संतोष राऊत:असगणी कुस्थळवाडी येथील मगांराग्रारोहयो अंतर्गत रस्ता कामाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी..
मालवण | प्रतिनिधी : मगांराग्रारोहयो – महाराष्ट्र अंतर्गत
असगणी कुस्थळवाडी ते तारभाटवाडी मुख्य रस्त्यास जोडणाऱ्या रस्ता कामाची चौकशी करण्याबाबतची लेखी तक्रार संतोष राऊत यांनी मालवण गटविकास अधिकारी आत्मज मोरे यांच्याकडे निवेदन माध्यमातून दिली होती, मात्र अपेक्षित न्याय न मिळाल्याने 23 सप्टेंबर रोजी मालवण पंचायत समिती, गटविकास अधिकारी यांच्या दालनासमोर लाक्षणिक आंदोलन छेडण्याचा इशारा संतोष राऊत यांनी दिला आहे. त्याबाबतचे निवेदन प्रशासन तसेच मालवण पोलीस स्टेशन मध्ये देण्यात आले आहे.
संतोष बाळा राऊत दिनांक 19 जुलै 2024 रोजी ऑनलाइन माध्यमातून प्रशासनान व लोकप्रतिनिधी यांचे लक्ष वेधताना ई-मेल द्वारे तक्रार करण्यात आली होती. मात्र चार महिने होऊनही त्याची चौकशी होत नाही. त्याची कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी पंचायत समिति मालवण गटविकास अधिकारी यांना चौकशीसाठी निवेदन देण्यात आले. चौकशी झाली नाही तर 23 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10 वा.मालवण पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या दालना समोर लाक्षणिक उपोषण छेडले जाईल. त्यातूनही न्याय न मिळाल्यास आणि दोषीवर कार्यवाही न झाल्यास आमरण उपोषण करणार असे निवेदन सादर करण्यात आले आहे.
मालवण पंचायत समिती येथे २० सप्टेंबर रोजी सदर गावचे सरपंच, ग्रामरोजगार सेवक आणि संतोष राऊत यांच्या उपस्थितीत गटाविकास अधिकारी आत्मज मोरे यांनी अधिकारी वर्ग यांच्या उपस्थितीत चर्चा केली. माहिती जाणून घेतली. मात्र योग्य ती कारवाई होत नाही तोपर्यंत लोकशाही मार्गाने उपोषण करण्याचा भूमिकेवर आपण ठाम असल्याचे संतोष राऊत यांनी म्हटले आहे.
