सावंतवाडी : मळगाव ब्राम्हणपाट येथील अंगणवाडी सेविका माया प्रवीण सातार्डेकर पूर्वाश्रमीच्या माया राऊळ (४५, रा. मळगाव रेडकरवाडी) यांचे शनिवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
माया ह्या सदैव हसतमुख व मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. पतीच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे मळगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, दीर, भावजयी, पुतणे, पुतण्या, आई, तीन भाऊ, बहिण असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थीवावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मळगाव येथील अंगणवाडी सेविका माया सातार्डेकर यांचे निधन…!
