⚡वेंगुर्ला ता.२२-: वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या सार्वजनिक नवरात्रौत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी संदेश निकम, उपाध्यक्षपदी सुजित चमणकर, सचिवपदी अजित राऊळ तर खजिनदारपदी प्रकाश गडेकर यांची एकमताने निवड करण्यात आली.
वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या कार्यालयात सार्वजनिक नवरात्र उत्सव २०२४ पार पडण्या संदर्भात तालुकाप्रमुख यशवंत परब यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेच्या तालुका मध्यवर्ती कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनातर्फे पतिवषाप्रमाणे साजरा केल्या जाणा-या सार्वजनिक नवरात्र उत्सव नियोजन कमिटीची निवड एकमताने करण्यात आली. या कमिटीच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश निकम यांची, उपाध्यक्षपदी शिवसेनेचे उभादांडा विभाग प्रमुख सुजित चमणकर यांची, सचिवपदी शिवसेनेचे वेंगुर्ला शहरप्रमुख अजित राऊळ यांची तर खजिनदारपदी आडेली येथील उपजिल्हा प्रमुख प्रकाश गडेकर यांची तसेच सल्लागार म्हणून शिवसेनेचे तालुकाप्रमुख यशवंत परब, हेमंत मलबारी, संदीप केळजी, अजय सारंग, उपतालुकाप्रमुख उमेश नाईक, विवेक आरोलकर, अॅड.जी.जी.टांककर, सुधाकर राणे, संदीप पेडणेकर, अभिमन्यू भुते, प्रसाद माडये, करण राऊत, सुहास मेस्त्री, सचिन मांजरेकर, तुषार कामत, मकरंद गोंदयाळे यांची तर व्यवस्थापन कमिटीवर पंकज शिरसाट, अस्मिता राऊळ, मंजुषा आरोलकर, सुकन्या नरसुले, कोमल सरमळकर, डेलीन डिसोजा, सुमन निकम, अरुणा माडये, चैत्राली बागायतकर, शैलेश परुळकर, गजानन गोलतकर, सुरेश वराडकर, मिथुन सातार्डेकर यांची आणि दुर्गामाता पूजन कमिटीवर दिलीप राणे व अभिनय मांजरेकर यांची निवड एकमताने करण्यात आली.
फोटो – संदेश निकम, सुजित चमणकर, अजित राऊळ, प्रकाश गडेकर
